मालमत्ता कर अभय योजनेला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या मालमत्ता कर अभय योजनेस महापालिकेतर्फे 28 फेबु्रवारीपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मागील पावणेदोन वर्षांपासून कोव्हीडच्या कमी - जास्त प्रसारामुळे नोकरी, व्यवसाय व उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्यासह नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मालमत्ता कर अभय योजनेस मुदतवाढ देण्याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना नागरिकांकडून विनंती करण्यात येत होती. दि.31 जानेवारी 2022 रोजी अभय योजनेच्या मुदतवाढीचा कालावधी संपत असल्याने आयुक्तांनी मालमत्ता कर अभय योजनेस 1 महिना म्हणजेच 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नातील मालमत्ताकर हा मुख्य स्त्रोत असून दि. 01 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत थकीत (उर्वरित पान 3 वर)