ठाणे (प्रतिनिधी) - कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्विकारलेल्या दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणारा ठाणे महापालिकेचा सन 2021- 2022 चा सुधारित 3510 कोटी रूपयांचा तर सन 2022-2023 सालचा 3299 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प काल महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. ठाणे महापालिका कार्यकालातील महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
गतवर्षातील पहिला अर्थसंकल्पमध्ये कोरोना या जागतिक महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी तसेच नागरिकांवर अनेक बंधने आणावी लागली त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्न स्तोत्रांवर झालेला होता. अशा परिस्थितीत विविध उत्पन्न स्तोत्रापासून अपेक्षित उत्पन्नाचे व त्याप्रमाणात खर्चाचे अधिकाअधिक वास्तविकतेच्या जवळ जाणारे अंदाज गृहीत धरुन चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
सन 2021-22 या आर्थिक वर्षातही या जागतिक महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम राहिल्याने दुसरी व तिसरी लाट नियंत्रित आणण्यासाठी शासनाद्वारे लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांतर्गत लॉकडाऊन, संचारबंदी इत्यादीचा परिणाम महापालिकेच्या प्रत्यक्ष उत्पन्नावर झालेला आहे. मात्र अशा संकटकालीन परिस्थितीतही सर्वांच्या सुयोग्य नियोजनामुळेच शहराची यशस्वी वाटचाल सुरु आहे. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणार्या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक रु. 2755 कोटी 32 लक्ष रकमेचे तयार करण्यात आले होते. यामध्ये काही विभागांकडून अपेक्षित केलेले उत्पन्न साध्य होत नसले तरी शहर विकास विभागाकडून अपेक्षित उत्पन्नापेक्षा मोठया प्रमाणात वाढ झाल्याने तसेच शासनाकडून क्लस्टर योजना, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा अंतर्गत अनुदान तसेच माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस रक्कम इत्यादीचा विचार करता सुधारित अंदाजपत्रक रु.3510 कोटी रकमेचे तयार केले आहे व सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रु.3299 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.मालमत्ता कर व फी पासून सन 2021-22 मध्ये रु.693 कोटी 24 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर 2021 पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न रु.420 कोटी 88 लक्ष विचारात घेवून मालमत्ता करापासून रु.596 कोटी 39 लक्ष उत्पन्नाचे सुधारित अंदाज करण्यात आले आहे.सन 2022-23 मध्ये मालमत्ता कर व फीसह रु. 713 कोटी 77 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे.
सन 2021-22 मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी रु.342 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. माहे डिसेंबर 2021 अखेर शहर विकास विभागाकडून रु.776 कोटी 27 लक्ष प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शहर विकास विभागाकडील उत्पन्न रु.342 कोटी वरुन रु.941 कोटी 64 लक्ष सुधारित करण्यात आले आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात रु.500 कोटी 42 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे.
स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु.907 कोटी 20 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.230 कोटी, स्थानिक संस्था कर व जकातीची मागील वसुली रु.15 कोटी 50 लक्ष असे एकूण रु.1152 कोटी 70 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत आहे. डिसेंबर 2021 अखेर वस्तू व सेवाकर अनुदानापोटी शासनाकडून प्रत्यक्षात रु.680 कोटी 13 लक्ष प्राप्त झाले आहेत.मुद्रांक शुल्कापोटी सुधारित अंदाज रु.50 कोटी अपेक्षित केले आहे. तसेच स्थानिक संस्था कर व जकात कराच्या मागील थकबाकी वसुलीपोटी रु.15 कोटी 50 लक्ष अपेक्षित उत्पन्नापैकी डिसेंबर 21 अखेर रु. 12 कोटी 11 लक्ष प्राप्त झाले आहेत. यामुळेच या सर्व बाबींचा विचार करुन स्थानिक संस्था कर विभागाचे मूळ अंदाज रु. 1152 कोटी 70 लक्ष पैकी डिसेंबर 21 अखेर रु.725 कोटी 6 लक्ष प्राप्त झाल्याने सुधारित अंदाज एकूण रु.971 कोटी 99 लक्ष अपेक्षित केले आहेत
पाणी पुरवठा आकारासाठी सन 2021-22 मध्ये रु.200 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. डिसेंबर 2021 अखेर पाणी पुरवठा आकाराचे प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न रु.53 कोटी विचारात घेता सुधारित अंदाज रु.158 कोटी अपेक्षित केले असून सन 2022-23 मध्ये रु.200 कोटी उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.अग्निशमन विभागासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रु. 104 कोटी 80 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.21 कोटी 5 लक्ष अपेक्षित केले होते. डिसेंबर 2021 अखेर रु.5 कोटी 97 लक्ष प्रत्यक्षात उत्पन्न प्राप्त झाले असल्याने स्थावर मालमत्ता विभागाचे सुधारित अंदाज रु.15 कोटी 33 लक्ष अपेक्षित केले आहे. सन 2022-23 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.21 कोटी 5 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
जाहिरात फी पोटी सन 2021-22 मध्ये रु. 22 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फी पासून रु.12 कोटी उत्पन्न अपेक्षित केले असून सन 2022-23 मध्ये रु.22 कोटी उत्पन्न अंदाजित करण्यात आले आहे.क्रीडाप्रेक्षागृह, नाटयगृह, तरणतलाव इत्यादीसाठी सुधारित अंदाजपत्रकात उत्पन्नाचे उद्दिष्ट कमी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोव्हीडच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्यामुळे रुग्ण फी कमी प्रमाणात जमा झाली आहे.
सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रु.107 कोटी 67 लक्ष अनुदान अपेक्षित होते. डिसेंबर 2021 अखेर रु.322 कोटी 15 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. सुधारित अंदाजपत्रकात रु. 342 कोटी 97 लक्ष अपेक्षित केले असून सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रु.111 कोटी 70 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.
आजमितीस महापालिकेवर रु.142 कोटी 71 लक्ष कर्ज शिल्लक आहे. सन 2021-22 तसेच सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात कर्ज अपेक्षित केलेले नाही.अशा प्रकारे सन 2021-22 मध्ये आरंभिची शिल्लक रु.260कोटी 64 लक्षसह सुधारित अंदाजपत्रक रु.3510 कोटी व सन 2022-23 मध्ये आरंभिची शिल्लक रु.250 कोटी 76 लक्षसह मूळ अंदाज रु.3299 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.
सन 2021-22 मध्ये महसुली खर्चासाठी रु.1819 कोटी 61 लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. या आर्थिक वर्षात महसुली खर्चाच्या काही प्रमुख बाबींवर सुधारित अंदाजपत्रकात तरतुदी वाढवून देण्यात आल्या आहेत. या आर्थिक वर्षासाठी काही रक्कम, मागासवर्ग निधीमध्ये स्पील ओव्हरसाठी वाढ करण्यात आली असून भांडवली खर्च रु.1119 कोटी 1 लक्ष करण्यात आला आहे.
सन 2022-23 मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात काटकसरीचे धोरण कायम ठेवण्यात आलेले असून केवळ अत्यावश्यक असलेले नविन प्रकल्प वगळता हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे. तथापि, काही वैशिष्टयपुर्ण प्रस्तावित कामांचा थोडक्यात ऊहापोह खालीलपमाणे करण्यात आलेला आहे. तलाव सुशोभिकरणासाठी रु.10 कोटीची, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी तसेच जांभळी नाका मार्केट पुनर्विकासासाठी 5 कोटींची, पार्किंग सुविधांचे निर्माण व भुमिगत वाहनतळ यासाठी अर्थसंकल्पात रु.10 कोटींची तरतुदी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरणासाठी रु. 11 कोटी रकमेची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून रु.15 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असा एकूण रु.26 कोटींचा निधी शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरणसाठी उपलब्ध होणार आहे. शहर सौंदर्यीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रु.130 कोटीची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात रक्कम रु.25 कोटी वाढीव तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असा एकूण रु. 155 कोटी निधी शहर सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजनांसाठी रु.10 कोटी, अर्बन डेन्स फॉरेस्ट्रीसाठी 5 कोटी,थीम पार्क विकसित करणेसाठी रु.2 कोटी वाढीव तरतुदीसह एकूण रुपये 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्यासाठी रुपये 5 कोटी, रस्ते सुरक्षेसाठी फुटपाथ रु.10 कोटी, पाणी पुरवठा विस्तार व मजबुतीकरणासाठी रु.50 कोटी, वाहतुक नियमन उपाययोजनांसाठी रूपये 10 कोटी,रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करणेसाठी सुमारे रु. 250 कोटींची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून याव्यतिरिक्त रस्त्यावरील खड्डे बुजविणेकरीता रस्ते दुरुस्ती या लेखाशीर्षांतर्गत रु.10 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असे सुमारे रु. 260 कोटींचा निधी रस्त्याचेअद्यावतीकरणासाठी उपलब्ध होणार आहे.मॉडेला मिल येथे ट्रक टर्मिनसासाठी रु.1 कोटींची, वागळे इस्टेट येथे नाट्यगृह बांधणेसाठी लेखाशीर्षांतर्गत रु.5 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तसेच, खारेगाव येथे ट्रक टर्मिनस विकसित करणेचे नियोजित आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत विविध कामांसाठी रु.149 कोटी निधी उपलब्ध करण्यात येत असून सदर कामांची अंमलबजावणी सुरु आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिका व सिडको यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. प्रदुषण निंयत्रणाकरीता विविध योजना / कामे यासाठी रु.48 कोटी निधी उपलब्ध करण्यात येत असून यात प्रामुख्याने परिवहन सेवेकरीता 81 इलेक्ट्रीक बसेस खरेदी करणे, वागळे इस्टेट स्मशान भुमीमध्ये झछॠ शवदाहिनी बांधणे, डुशशळिपस मशीन खरेदी करणे, पालापाचोळा कचरा व्यवस्थापनासाठी केीींळर्लीर्श्रींीीश उेािेीींळपस झश्ररपीं उभारणे,धुळ प्रदुषण नियंत्रणासाठी चळीीं ीिीरू ारलहळपश उभारणी करणे या कामांचा समावेश आहे.तसेच वर्ष 2022-23 मध्ये अधिकचा रु. 48 कोटी निधी उपलब्ध होणार असून एकंदरित रु. 96 कोटी निधीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
माझी वसुधंरा अभियान अंतर्गत कामासाठी रु.10 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात येत असून ही कामे हाती घेण्यात येतील. घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत विविध योजना व कामे यात डायघर येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अंतर्गत टप्पा क्र. 1 कार्यान्वयीत करणे, यासाठी रु. 20 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. कचरा संकलनासाठी यंत्रणेसाठी 50 ई-रिक्षा खरेदी करण्याचे नियोजन आहे.याकरिता सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात रु. 10 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. भंडार्ली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प याकरिता भंडार्ली क्षेपणभूमी विकास व कचरा वेचकांचा सहभाग योजना यासाठी प्रत्येकी रु. 5 कोटींची तरतुदी केली आहे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिका शाळा मजबुतीकरणासाठी अंदाजपत्रकात रक्कम रु.20 कोटींची, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व त्याला सलग्न असलेले राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांचे सशक्तीकरणासाठी रु.10 कोटी,पार्किंग प्लाझा येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना या कामांचा समावेश आहे.