ऐरोली (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिघा वार्ड क्र.4 मधील महिला पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त महिला पदाधिकार्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस, दिघा तालुका अध्यक्ष गौरी किशोर आंग्रे यांच्याहस्ते नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले. या पदाधिकार्यांमध्ये पुष्पा कांबळे (अध्यक्ष), नंदिनी पांचाळ (उपाध्यक्ष), शिल्पा सोनकांबळे (सरचिटणीस), पूनम गायकवाड (चिटणीस), संतोषी कांबळे (सचिव), आरती गायकवाड व सदस्यांमध्ये मीनाक्षी कांबळे, अंजली गायकवाड व माधवी सोनकांबळे यांच्या नावाचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई प्रभारी आ.शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार व नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
दिघा वार्ड क्र.4 मधील राष्ट्रवादी महिला पदाधिकार्यांची निवड