महाराष्ट्राच्या 55 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा हर्षोल्हासात भव्य शुभारंभ मानवतेची सेवा हाच परम धर्म होय- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

 


मुंबई (प्रतिनिधी)- संतांच्या हृदयात सर्वांच्या भल्याची कामना असते. त्यांचे प्रत्येक कर्म मानवतेच्या भल्यासाठी घडत असते.’ असे उदगार सद्गुरु  माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 55 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विधिवत शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.

चेंबूर स्थित निरंकारी सत्संग भवनातून या संत समागमाचे थेट प्रक्षेपण संत निरंकारी मिशनची वेबसाईट ुुु.पळीरपज्ञरीळ.ेीस आणि साधना टी.वी.चॅनलच्या माध्यमातून केले जात आहे, ज्याचा आनंद देश-विदेशामधील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या प्राप्त करत आहेत.

सद्गुरु माता सुदीक्षाजींनी आपल्या भावना अभिव्यक्त करताना म्हणाल्या, की सर्वांभूती प्रेम, दया, करूणा, सहनशीलतेचा भाव मनामध्ये धारण केल्यास या जगाला स्वर्गमय केले जाऊ शकते. आपला देश आणि संपूर्ण विश्वासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.

विश्वासाला दृढता प्रदान करताना सद्गुरु माताजींनी सांगितले की, इतरांचा विश्वास डळमळीत होईल असे कृत्य मानवाने न करता आपण स्वत:चा विश्वास दृढ करत असतानाच इतरांनाही दृढता प्रदान करायची आहे. या व्हर्च्युअल रुपातील संत समागमामध्ये भाग घेणार्‍या वक्त्यांनी गीत, कविता आणि विचारांच्या माध्यमातून आपले भाव यावेळी प्रकट केले. जे अनेकतेत एकतेचे सुंदर चित्रण प्रस्तुत करत होते.