नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट होवू लागल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, काल नवी मुंबईत 60 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर रविवारी ही संख्या 86 इतकी होती. तर सोमवारी 438 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, नवी मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच नवी मुंबईत आतापर्यंत एकूण 1 लाख 50 हजार 302 लोकांना कोरोना लागण झाली आहे. नवी मुंबईत सध्या उपचार सुरु असलेल्या सक्रिय रूग्णाची संख्या 1426 इतकी झाली आहे.
नवी मुंबईत काल एकूण 6913 कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 2980 तर 3933 जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली असल्याचे नवी मुंबई महापालिकेने सांगितले आहे.