नवी मुंबई (प्रतिनिधी) - अश्विनी बिद्रे हत्याकांड खटलाच्या सुनावणीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, एमटीएनएलचे नोडल अधिकारी धोतरे यांना समन्स लागू करूनही ते कालच्या सुनावणीस, कोर्टापुढे साक्षीसाठी न आल्याने विशेष सरकारी वकील यांनी केलेल्या विनंतीवरून मा. न्यायालयाने एमटीएनएलचे नोडल अधिकारी धोतरे यांच्याविरोधात वॉरंट काढले आहेत.
पीएसआय नरेंद्र काशीनाथ कोरे हे यापूर्वी वारंवार साक्षीसाठी गैरहजर राहिल्यामुळे गत वेळच्या सुनावणीप्रसंगी कोरे यांच्याविरोधात कोर्टाने वॉरंट बजावल्यामुळे कालच्या खटल्याच्या सुनावणीस ते हजर होते. कोरे हे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ष 2014 ते 2016 दरम्यान काश्मीरा युनिट याठिकाणी कार्यरत असताना गरज असेल तेव्हा शासकीय गाडीवर ड्रायव्हींग करायचा. अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल रोजी झाल्यानंतर दि.12 व 13 एप्रिल 2016 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्या सोबत नाईट रॉऊड , दिवस गस्ती केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.मात्र शासकीय गाडीने 13 एप्रिल रोजी ठाणे कोर्टात आरोपींना घेवून परत काश्मिरा युनिटला आलो होतो व त्याबाबतची नोंद लॉकबुक मध्ये केली होती. ती नोंद आणि ते लॉकबुक कोर्टापुढे कोरे यांना दाखविले असता, त्यातील अक्षर आणि लॉकबुक ही ओळखले. यानंतर आरोपीच्या वकीलांकडून उलट तपासणी घेण्यात येवून ती पूर्ण झाली. कालच्या या सुनावणीस विशेष सरकारी वकील प्रदीप यांच्यासह, राजू गोरे , एसीपी संगिता शिंदे- अल्फान्सो , नवी मुंबई गुन्हेशाखेचे अधिकारी व कर्मचारी, आरोपीचे वकील हजर होते.पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.