नवी मुंबई (प्रतिनिधी) - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्यानिमित्ताने नवी मुंंबई महापालिका कर्मचार्यांनी अभिजात साहित्यकृतींमधील वेचक भागाचे अभिवाचन करण्याचा उपक्रम नुकताच राबविला.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ‘सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा’ रूपाने राबविण्यात आला. दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना टंकलेखनाप्रमाणेच स्वहस्ताक्षरातही मजकूर लिहावा लागतो. त्यामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी यांचे हस्ताक्षर चांगले असल्याचे दिसून येते. अशा सुंदर हस्ताक्षर असणार्या कर्मचारीवृंदाच्या हस्ताक्षराची प्रशंसा व्हावी तसेच इतर कर्मचार्यांमध्येही तशा प्रकारची भावना निर्माण व्हावी यादृष्टीने माझी वसुंधरा अभियान अभियानाची शपथ अधिकारी, कर्मचारीवृंदाने आपल्या हस्ताक्षरात लिहून द्यावी, त्याचे त्रयस्थ मान्यवराकडून परीक्षण व्हावे व त्यामधील सर्वोत्तम हस्ताक्षर असणार्या कर्मचार्यांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित करावे अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाची शपथ स्वहस्ताक्षरात लिहून देण्याचे अधिकारी, कर्मचारीवृंदास आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद देत सुंदर हस्ताक्षर असणार्या 102 अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. अमृता आमोदकर यांनी प्राथमिक परीक्षण केले. नामांकीत सुलेखनकार अच्युत पालव यांनी या स्पर्धेचे अंतिम परीक्षण करीत अशाप्रकारे संगणकाच्या जमान्यात हस्ताक्षर लेखनाला प्रोत्साहीत करणा-या आयुक्तांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले.
माझी वसुंधरा अभियानाच्या शपथचे सुंदर हस्ताक्षर लेखन करणार्या अधिकारी, कर्मचारीवृंदास प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव यांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.सुलेखन कलेच्या माध्यमाव्दारे शपथेचे सुंदर हस्ताक्षर लेखन करणार्या 4 कर्मचार्यांचा स्पर्धेसाठी स्वतंत्र विचार करण्यात आला. त्यामधून शिक्षण विभागातील शिक्षक प्रशांत गाडेकर यांना सर्वोत्तम हस्ताक्षर सुलेखनाचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे नियमित लेखन स्वरूपात सुंदर स्वहस्ताक्षरात शपथ लेखन करणार्या 98 महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून जिज्ञेश देवरूखकर (समाजविकास विभाग) प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.पांडुरंग काठवले (गौरव म्हात्रे कलाकेंद्र, सीबीडी बेलापूर), निलेश पवार (घनकचरा व्यवस्थापन विभाग, ऐरोली) हे अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमाकांचे पारितोषिक विजेते ठरले. उत्तेजनार्थ पारितोषिकांनी लवेश पाटील (वाशी विभाग कार्यालय), चारूशीला शिंदे (स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष), विजय आंब्राळे (सचिव विभाग), वर्षा कुंभार (माहिती व जनसंपर्क विभाग), लक्ष्मण जाधव (विधी विभाग), स्वाती अमृते (लेखा विभाग), नितीन म्हात्रे (ऐरोली विभाग कार्यालय) या 7 कर्मचार्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियानाची शपथ सामुहिकरित्या ग्रहण करण्यात आली.