रिक्षा चालक मालकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करा !

 


परिवहन आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी)- ओला उबेरने सुरु केलेली टू व्हीलर बाईक रेपिडो बंद करण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, नव्याने सुरु केलेला वाढीव दंड रद्द करण्यात यावा,यासह इतर विविध प्रश्नांवर विभाग आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्षा चालकांसह मालकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांची सोडवणूक करा अशी मागणी करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, मुंबई मेन्स रिक्षा युनियनचे अध्यक्ष शशांक राव , लोहा पंचायत समितीचे उपाध्यक्ष प्रताप,  पावर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रगायकवाड आदींसह विविध ठिकाणच्या रिक्षा संघटनांचे नेते व अध्यक्षांसह राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.