पनवेल (प्रतिनिधी)- बंजारा समाजातील थोर समाजसेवक, संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यावेळी उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक समीर ठाकूर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे,महापालिकेतील विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल मनपात संत सेवालाल महाराज जयंती साजरी