रबाळे स्वस्तिक हॉस्पीटलमध्ये रविवारी महारक्तदान शिबीर

 


ऐरोली (प्रतिनिधी) - स्वस्तिक हॉस्पीटल, केमिस्ट ब्लड संेंटर नवी मुंबई आणि निलम केमिस्ट रबाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि.13 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत रबाळेनाका येथील स्वस्तिक हॉस्पीटलमध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रूग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्वाची ठरत असते. अपघात, बाळंतपण, डायलेसिसचे रूग्ण, एचआयव्हीबाधीत, टीबी, कर्करोग, सिकलसेल व थॅलेसेमिया या विविध आजारांच्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज पडते. एक पिशवी रक्त दिल्याने साधारणपणे तीन लोकांचा जीव वाचवता येवू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेवून या महारक्तदान शिबीराचे आयोजन केले असून रक्तदात्यांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन निलम केमिस्टचे मालक व समाजसेवक लहानु ननावरे यांनी केले आहे. या शिबीरात सहभागी होण्यासाठी रक्तदात्यांनी भ्रमणध्वनी क्र. 9820754248 येथे संपर्क साधावा.