माऊली कृपा सहकारी संस्थेवर ‘परिवर्तन पॅनेल’


 घणसोली (प्रतिनिधी) - घणसोलीतील माऊली कृपा सोसायटीच्या निवडणुकीत स्थानिक रहिवाशांनी  भाजप  प्रणीत उन्नती पॅनलचा  दारुण पराभव केला. महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व 17 जागा जिंकल्या आहेत. माथाडी कामगारांची वस्ती म्हणून ओळख असलेली घणसोली येथील सेक्टर-7 मधील माऊली कृपा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक काल पार पडली. या सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून सौरभ शिंदे यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे  पुनर्विकासाचे मुद्द्यावर ही निवडणूक दोन्ही गटाकड़ून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत माऊली कृपामधील रहिवाशांनी  उन्नती पॅनलच्या सर्वच उमेदवारांना पराभूत केले. विजयी उमेदवारांमध्ये पोपट दहिफळे, धनंजय मोरे, भास्कर बहादुरे, संगीता खबले, संजना पार्टे, अमित जवळ, सुभाष साबळे, लक्ष्मण शेवाळे, अंकुश रांजणे, शंकर शेलार, अनिल सलामवाडे, शैलेश दुंदळे, अजित गोळे, उमेश चोरगे, संतोष जाधव, दिलीप गुळवे आणि दीपक सुर्वे आदींचा समावेश आहे..