पर्यावरणाच्या जपवणूकीसाठी अंकूर संस्थेतर्फे पर्यावरणपूरक हळदीकूंकू

 


वाशी (प्रतिनिधी) - पर्यावरण, शून्य कचरा या विषयावर कार्य करणार्‍या  नवी मुंबईतील अंकुर सामाजिक संस्थेतर्फे  नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दि. 29 आणि 30 जानेवारी या दोन दिवसांत सीवूडमधील ग्रँड सेंटर मॉल, येथे पर्यावरणपूरक हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. 

अंकूर संस्थेतर्फे घरगुती पद्धतीने कंपोस्टिंग, कचरा वर्गीकरण व त्याचा सुयोग्य विनियोग, बायो एंंजाईम, सेंद्रिय पद्धतीने बागकाम, सेंद्रिय कीडनाशके व खत यावर कार्यशाळेद्वारे प्रबोधन केले जाते. पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करत आपले सण, समारंभ, परंपरा कसे साजरे केले जावेत याचा भाग म्हणून संस्थेतर्फे ग्रँड सेंटर मॉल, सिवूडस येथे हा पर्यावरणपूरक हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उपस्थित महिलांना वाण म्हणून कापडी पिशवी देऊन प्लास्टिकचा वापर कमी करा व त्याऐवजी कापडी पिशवीचा वापर करा हा संदेश जनमानसात पोहचविण्याबाबतची जनजागृती करण्यात आली. या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमासासाठी ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापन व नवी मुंबई महापालिका यांचे विशेष सहकार्य लाभले.