उरण (वार्ताहर) - उरण तालुका वकील संघटनेची नुकतीच निवडणूक सपन्न झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दत्तात्रेय नवाळे यांची बहुमताने करण्यात आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रेय विठ्ठल नवाळे यांनी 2022-23 सालाकरिता कार्यकारणीची निवड पुढील प्रमाणे केली आहे. उपाध्यक्षपदी भारती पांडुरंग भोईर,किशोर धनाजी ठाकूर, सचिवपदी प्रसाद नामदेव पाटील, खजिनदारपदी अर्चना सुनील माळी, ऑडीटर संतोष नारायण पाटील, सभासद अझीमन रईस अहमद अन्सारी, वृषाली नवनीत पाटील, विपुल रमाकांत ठाकूर, धिरज लहू डाकी अशी आहे. उरण तालुका वकील संघटनेच्या 2022-23 या सालाकरिता नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आलेल्या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊन पुढील कार्यास अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.