पनवेल (प्रतिनिधी) - डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात पनवेल काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या अध्यक्षतेखाली एका विस्तारित बैठकीचे आयोजन काँग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश डिजिटल सदस्य नोंदणी कंट्रोल रूमचे प्रमुख आनंद सिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्वत्र जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल याबाबत भर देण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात आढावा घेऊन काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य कसे जोडता येतील या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी जि.प अध्यक्ष अनंत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, अरविंद सावळेकर, आदम ढालाईत, भक्तीकुमार दवे, माया अहिरे, लतीफ शेख, पूजा मोहन, जयवंत देशमुख, अरुण कुंभार, डॉ. राजेश घरत, राहुल जाणोरकर, राजीव चौधरी, भारती जळगावकर, मर्फी म्हसकर व आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.