पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व कुष्ठरोग दिनानिमित्त कुष्ठरोग निर्मूलनासाठी यावेळी शपथ घेण्यात आली. तसेच स्पर्श अभियानांतर्गत कामोठे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील टिमतर्फे कामोठे पोलिस ठाणे, ओरिअन मॉल पनवेल, लिटल वर्ल्ड खारघर आदी विविध ठिकाणी पथनाट्य कार्यक्रमांचे आयोजन करून कुष्ठरोगविषयक जनजागृती करण्यात आली.
यावेळी कामोठे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पद्मिनी येलवे, डॉ. किर्ती हंपे, डॉ. विनायक देशमुख,डॉ. अनिल पाटील, डॉ. शुभम पाटील, डॉ. अंजली सावंत तसेच वैद्यकीय अधिकारी व स्टाफ अर्जुन ठाकूर, कुष्ठरोग तंत्रज्ञ उपस्थितीत होते.कामोठे 1डिसेंबर 2021 पासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने आशा वर्कर्स व परिचारिका महापालिका क्षेत्रातील घरोघरी जाऊन संशयित क्षयरूग्ण व कुष्ठरोगी शोधून काढण्याची मोहिम राबवली जात आहे.