तुर्भेगावात पुलवामातील शहीदांना श्रध्दांजली

 

14 फेब्रुवारी 2019 रोजी  काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना काल तुर्भेगावात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (ओबीसी सेल) सचिव डॉ.विनोद पाटील व नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.विजय पाटील यांच्यावतीने तुर्भेगाव तलाव पोस्ट ऑफिस समोर याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बबन पाटील, साईनाथ पाटील, अ‍ॅड.बिपिन घरत, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रमोद पाटील, गोरखनाथ पाटील, हर्षल पाटील, राजेश पाटील, लक्ष्मण पाटील, लता पाटील आदींसह तुर्भेगाव ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.