पनवेल (प्रतिनिधी) - नवीन पनवेल काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या पुढाकारातून नुकताच हळदीकुंकू समारंभ व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला.
अध्यक्षा पूजा मोहन ह्यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, महिला काँग्रेस कमिटीच्या तृत्पी शेनोई, आरती ठाकूर, पनवेल शहर जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष सुरेश पाटील,उपाध्यक्ष सुधीर मोरे आदींसह पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या सर्व ब्लॉक अध्यक्षा व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा सेवादल अध्यक्ष राजीव चौधरी, नविन पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष राहुल जानोरकर व नवीन पनवेल युवक काँग्रेस सरचिटणीस तुषार पवार व त्यांचे युवक काँग्रेसचे सहकारी आशुतोष चेट्टीयार आदींचे विशेष सहकार्य लाभले.