पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेडूंग टोलनाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली त्वरीत बंद करावा असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सदर टोलच्या मुख्य व्यवस्थापन यांना दिल्याने टोलचा झोल करणारे टोल नाक्यावाल्यांचे धाबे दणालले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात नागरीकांच्या हिताच्या बाजुने अनेक वेळा टोल विरूध्द आक्रमक पावित्रा घेतला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मनसेने खळ-खट्याक आंदोलने टोल नाक्यावर केल्याने अनेक ठिकाणी जनतेची बेकायदेशीर लुट करणारे टोल नाके बंद झाले. असाच एक टोल नाका पनवेल जवळील शेडुंग फाटा येथे असून कर्जत,खालापुर,पनवेल येथील स्थानिक नागरीकांना या बेकायदेशीर टोल वसुलीतून सुट मिळावी याकरीता थेट मनसेकडे तक्रारी प्राप्त होण्यासह काही नागरीकांनी याबाबत मनसेचे नेते प्रथमेश सोमण यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, प्रथमेश सोमण यांनी शेडुंग टोल नाक्याचे मुख्य व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून स्थानिकांची बेकायदेशीर होणारी टोल वसुली त्वरीत थांवविण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा सदर टोल विरूध्द मनसे आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही सोमण यांनी निवेदन देतांना दिला आहे.