पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी कैलास गावडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल खांदा वसाहत सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार कऱण्यात आला. पनवेल महापालिका कार्यालय, पनवेल या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात गावडे यांचा सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सदानंद शिर्के, संतोष जाधव, शिवाजी दांगट, ओंकार गावडे, विश्राम एकंबे, बी आर कदम, रमेश बांदल, ओमकार जाधव, विशाल काळे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.