उरण (वार्ताहर) - भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या अचानक जाण्याने देश शोकसागरात बुडाला होता. उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अजय मोकल या तरुणाने रांगोळीद्वारे लतादीदींचे हुबेहूब चित्र रेखाटून अनोखी श्रद्धांजली वाहिली.
भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी यांचे रविवार दि. 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली होती. लतादीदीच्या निधनाने देशभरात विविध कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली जात होती. तालुक्यातील चिरनेर गावातील अजय मोकल या तरुण कलाकाराने आपल्या कलाकौशल्याने अनेक रांगोळी साकारल्या आहेत. लतादीदींच्या निधनानंतर अजय मोकल या कलाकाराने रांगोळीतून त्यांचे हुबेहूब चित्र रेखाटून अनोखी अशी श्रद्धांजली वाहिली. लतादीदींचे रांगोळीतून काढलेले चित्र पाहून अनेकांनी अजय मोकल यांच्या कलेची प्रशंसा करीत श्रद्धांजली वाहिली.