कराटे स्पर्धेत शोतोकॉनची चमकदार कामगिरी

 

पनवेल (वार्ताहर) - रायगड युनिफाईट असोसिएशनच्या वतीने सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल स्कुल आकुर्ली येथे 9 व्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने 10 सुवर्णपदक 9 रौप्यपदक आणि 2 कांस्यपदक मिळवत तृतीय क्रमांक संपादित केला. विजेत्या खेळाडूंची 27 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी कराड येथे होणार्‍या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेते सर्व खेळाडु आगरी शिक्षण संस्था, एड्युकिडझ इंटरनॅशनल खांदा कॉलनी येथे सेन्सेई प्रतिक कारंडे यांच्याकडे कराटे आणि इतर मार्शल आर्टस्चे प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या खेळाडुंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी विशेष कौतुक केले आहे.