उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी सन्मानित!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवी मुंबई पोलिस दलातील मध्यवर्ती गुन्हेशाखा कक्षाच्या पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आदींचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह भोसले, वपोनि गिरीधर गोरे, वपोनि सुनील शिंदे, उरणचे वपोनि सुनील पाटील यांच्यासह एपीआय राजेश गज्जल, निलेश तांबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल कदम, पोलिस हवालदार मंगेश वाट, नितीन जगताप, पोलिस नाईक लक्ष्मण कोपरकर, सचिन टिके, आजिनाथ फुंदे, विष्णू पवार, महेश पाटील व इतर आदींचा समावेश  आहे.