ठाणे (प्रतिनिधी) - मफतलाल कंपनीसाठी संपादन व खरेदी केलेल्या जमिनी कळवा खारीगाव येथील शेतक़र्यांना नवी मुंबईच्या धर्तीवर 12.5 टक्के ऐवजी 15 टक्के जमिन मिळावी यासाठी तसेच न्यायालयीन आदेशानुसार कळवे येथील खारभूमी जमीन कसणार्या शेतक़र्यांना देण्यात यावी या मागण्यांसाठी शेतकर्यांचे धरणे जन आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष कृती सेवा संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. बा. पाटील नामांतर सर्वपक्षीय कृती समिती व अखिल आगरी समाज परिषद या संघटनांनी पाठिंबा दिला होता, अशी माहिती संघर्ष कृती सेवा संस्थेचे संस्थापक सल्लागार दशरथदादा पाटील यांनी दिली.
याप्रसंगी माजी खा. जगन्नाथ पाटील, माजी आ. सुभाष भोईर, नगरसेवक उमेश पाटील, जे.डी. तांडेल, गुलाब वझे, दशरथ भगत, दिपक पाटील, वि. ह. म्हात्रे, राकेश पाटील, अरुण पाटील, नंदेश ठाकूर, अनिल भगत, सुनील पाटील आदी विविध संघटनांचे प्रतानिधी उपस्थित होते.