महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती

 

मुंबई - महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 बॅचे आयपीएस अधिकारी आहे. शेठ हे मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या वेळी त्यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते.

महासंचालक पदाच्या रेसमध्ये पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, रजनीश सेठ आणि के व्यंकटेशम होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही देखील सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.

याआधी संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची तात्पुरती जबाबदारी दिली होती. पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांना एप्रिल 2021 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी दिली होती. परंतु, पांडेंना महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका ड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले होते. येत्या पाच दिवसात महासंचालक पदासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला सांगितले होते. यानंतर काल (18 फेब्रुवारी) महासंचालक पदी राजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.