पनवेल (वार्ताहर) - शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कानपोली येथील भाजपच्या महिला सरपंच विजया कैलास पाटील, उपसरपंच नागा गिरा, सदस्य हिरामण उघडा व त्यांच्या इतर सहकार्यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, शाखा प्रमुख कानपोली प्रदीप पाटील, शाखा प्रमुख वावंजे सतिश पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे सरपंच व उपसरपंच शिवबंधनात!