रायगड (प्रतिनिधी) - रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काल संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र कुरा, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचे भूमीपूजन