नवी मुंबई (प्रतिनिधी) - मनसे महिला सेना रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन काल मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमित ठाकरे यांचे पनवेलनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी महिला आघाडी पनवेलच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्यासह जनमानसात जाऊन कार्य करा असे आवाहन युवा नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केले.
पनवेल तेजस बिल्डिंग तळ मजला ठाणा नाका प्रांत कार्यालयाच्या बाजूला याठिक़ाणी सुरु करण्यात आलेल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते अमित ठाकरे यांच्याहस्ते काल सकाळी करण्यात आले. अमित ठाकरे आल्याने पुन्हा नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळ पासून चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी नवनिर्माण सेना ध्वज अमित ठाकरे यांच्याहस्ते फडकवण्यात आला. रायगड जिल्हा मनसेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत व महिला सेना अध्यक्षा अदिती सोनार यांनी युवानेते अमित ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी महिला आघाडी पनवेलच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येवून जनमानसात जावून कार्य करा असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी मनसे आ.राजू पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे, स्नेहल जाधव, अक्षय काशीद जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, अक्षय सुतार जिल्हाध्यक्ष चित्रपट सेना, अविनाश पडवळ, वर्षा पाचभाई पनवेल तालुका अध्यक्ष, प्रिती खानविलकर पनवेल शहर अध्यक्ष, स्वरूपा सुर्वे पनवेल शहर उपाध्यक्षा, रुपाली मुरकुटे, तालुका सचिव, प्रथमेश सोमण तसेच पदाधिकारी आदींसह महिला आघाङी आणि तरुणाई उपस्थित होती.