ठामपात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 

ठाणे (प्रतिनिधी)  - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रविवारी आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस सभागृह नेते अशोक वैती, कार्मिक अधिकारी डी.जी. गोदेपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक जयानंद नायकोडी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी (प्र.) प्राची डिंगणकर, संदीप जिनवाल, पत्रकार रोहिणी दिवाण, रमेश ठाकूर, किस्तु फर्नांडिस, कुणाल भोईटे, हितेश पंचाल तसेच कर्मचारी उपस्थित होते.