हळदी कुंकू समारंभ साजरा

 

पनवेल (वार्ताहर) - पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे वैश्यवाणी एक हात मदतीचा या संस्थेतर्फे आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अशोक भोपतराव (रायगड जिल्हा वैश्यसमाज अध्यक्ष), श्यामल आंग्रे (रायगड जिल्हा महिला अध्यक्ष), सुनील शेट्ये (पनवेल तालुका वैश्य समाज अध्यक्ष), अंजना मनोरे (पनवेल महिला अध्यक्ष), माधवी चौधरी (कळंबोली महिला अध्यक्ष), विजया चौधरी (कार्यक्रम अध्यक्ष) प्रदीप (बापू) दलाल(अध्यक्ष), योगेश तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या समारंभाला महिलांची विशेष उपस्थिती होती. वाण देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्त्रीभ्रूण हत्या या ज्वलंत विषयासह इतर अनेक विविध पैलूंवर विजया चौधरी यांनी भाष्य केलेे.