बॅ. अंतूले यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
उरण (वार्ताहर) -कोकणचे भाग्य विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री स्व.बॅरिस्टर ए आर अंतूले यांच्या जयंती निमित्त अमन पॉलीक्लिनिक व क्वीन्स केअरच्या माध्यमातून ठाकूर अपार्टमेंट शॉप नंबर 2, यश मेडिकलच्या बाजूला, उरण शहर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन काँग्रेसचे अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री यांनी केले होते. यावेळी रुग्णांना मोफत ओपीडी सेवा देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी कोकण विभाग अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अमरीन मुकरी, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा सरचिटणीस -गणेश सेवक,रायगड जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस -जितेश म्हात्रे आदींसह इतर विविध काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या आरोग्य शिबिरास भेट देऊन या शिबिराचे कौतुक केले.