पनवेल (वार्ताहर) - पीर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सानिमित्त पनवेल शहर शिवसेनेतर्फे सुश्रुषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिरात 500 हुन अधिक लोकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, शुगर टेस्ट, सीबीसी, ईसीजी, पल्, एक्स रे, वजन तपासणी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात 500 हुन अधिक लोकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील व महानगर संघटक प्रथमेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या आरोग्य शिबिरास खा. श्रीरंग बारणे यांनी भेट दिली तसेच पनवेल शहरातील पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले.
या रक्तदान शिबिरास डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. रेश्मा शेख, नर्स साक्षी पाटील, लॅब टेक्निशियन ईश्वरी कल्याणकर आदींनी विशेष मेहनत घेतली. सदर शिबिरास शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव,माजी नगरसवेक लतीफभाई शेख, माजी उपशहर संघटक बाबुभाई, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.