बंदोबस्त करण्याची दिलीप आमले यांची पोलिसांकडे मागणी
नेरुळ (प्रतिनिधी)-नेरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील से-6 व इतर विविध परिसरात चोरट्यांनी धुुमाकूळ घातला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या या घटनांमुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस बंदोबस्त तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यासह से-6 सारसोळे व आजुबाजुच्या परिसरात रात्री 12 वाजेनंतर येणार्या प्रत्येक वाहनधारकांची तसेच संशयीत व्यक्तींची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना प्रणित शिववाहतूक सेवा नवी मुंबई अध्यक्ष किसन आमले यांनी नेरुळ पोलिस ठाणे वरिष्ठांकडे केली आहे.
नेरुळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना यासंदर्भात आमले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर्शन दरबार मार्ग से-6 (अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल) या मार्गावर काही दिवसांपासून चार जणांचे एक टोळके रात्री 3 वाजेच्या दरम्यान एका दुचाकीवर येतात व या टोळक्यांकडून या दरम्यान वाहनांमधील पेट्रोल चोरणे, रिक्षांचे टायर व बॅटरी चोरणे, तसेच रिक्षा व दुचाकी चोरीसह कारच्या काचा फोडून कारटेप चोरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. या प्रकारांमुळे विभागातील नागरिक त्रस्त होण्यासह त्यांच्या मनात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आपण पार्क केलेले वाहन सकाळपर्यंत त्या जागेवर असेल की नाही अशा स्वरुपाची भीती येथील रहिवाशांना कायम सतावत आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी से-6 सारसोळे व आजुबाजुच्या परिसरात रात्री 12 वाजेनंतर येणार्या प्रत्येक वाहनधारकांची तसेच संशयीत व्यक्तींची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी किसन आमले यांनी केली आहे.