बेलापूर (वार्ताहर) - युगनिर्माते प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर याठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून किल्ला परिसराची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत 70 ते 80 एनएसएस स्वंयसेवक, नवी मुंबई महापालिका अधिकारी, स्वच्छता दुत, मित्रपरिवार आदींसह खारघर येथील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील एनएसएस स्वंयसेवकांचा विशेष सहभाग लाभला होता. यावेळी युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी सर्व उपस्थितांना माझी वसुंधरेची शपथ दिली. दरम्यान, किल्ले बेलापूर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करेपर्यंत युगनिर्माते प्रतिष्ठान किल्ल्याच्या संवर्धनाकरिता काम करत राहील,अशी ग्वाही यावेळी समस्त सदस्यांनी दिली.
याप्रसंगी स्वच्छता अधिकारी मिलिंद तांडेल, समाजसेविका दर्शना भोईर, सरिता खैरवासिया, गोवर्धनी माता सेवा मंडळ अध्यक्ष मनोज बालम, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, युगनिर्माते प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, खजिनदार सुदर्शन कौदरे, सदस्य विशाल पिंगळे,बसवराज नंदी, प्रशांत शेलार, कोमल शेलार आदी उपस्थित होते.