नेरुळमध्ये शिववाहतूक सेवाभावी संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम

 


सानपाडा (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग यांच्या साहाय्याने शिव वाहतूकसेवा रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था व हुतात्मा बाबु गेणु रिक्षा स्टँडच्या माध्यमातून विभागातील सर्वच रिक्षा टँक्सी व इतर वाहन चालक व नागरिकांसाठी माघी गणेशोत्सव निमित्ताने हुतात्मा बाबु गेणु रिक्षा स्टँड नेरूळ येथे कोरोना पहिला व दुसरा डोस लसीकरण मोहिमेसह आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विभागातील वाहन चालकांनी सहभागी होवून लसीकरण मोहिमेसह आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. तसेच रिक्षा चालकांसाठी ना नफा ना तोटा या अंतर्गत आयोजित पीयुसी शिबिराचा शेकडो रिक्षा चालकांनी लाभ घेतला. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली शिववाहतूक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलिप आमले यांचा यासाठी विशेष पुढाकार लाभला.

 यावेळी सर्व रिक्षा चालक यांच्या सहकार्याने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अधिकारी सजय पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी नेरुळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाम शिंदे यांच्यासह मराठी अभिनेत्री नयना पवार (बाळु मामा) आदींसह धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक सतोष शेट्टी, नामदेव भगत, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक काशीनाथ पवार, सतिश रामाणे,मिरा पाटील, शिल्पा काबळे, सजय भोसले, महादेव पवार व इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. कमिटीचे अध्यक्ष सचिन लाड , सचिव नवनाथ कोतकर , खजिनदार अरूण गुरव ,उपाध्यक्ष प्रणय तुडिलकर, उपाध्यक्ष सजय दागडे, प्रमुख सल्लागार धनजय विश्वासराव आदींसह नेरूळ मधील शेकडो रिक्षा चालकानी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला.