नवी मुंबईतील रिक्षाचालकांसाठी कर्करोग तपासणी शिबीर संपन्न

 


नेरुळ (प्रतिनिधी) - नुकत्याच साजर्‍या झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे रिक्षाचालकांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 50 रिक्षाचालकांची मोफत कर्करोग विषयक तपासणी करण्यात आली.

या शिबीरात तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, डायबिटीस, उच्च रक्तदाब तसेच दातांची तपासणी करण्यात आली तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन सोडण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे समुपदेशन करण्यात आले. कॅन्सरबाबत जागृती वाढण्याची गरज असून प्रथम स्टेजमध्ये कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण अवघे 1 ते 2 टक्के आहे.  प्रतिवर्षी 10 ते 12  लाख रुग्णांना कर्करोगाचे निदान होत आहे. तितकेच रुग्ण यामुळे दगावतात, भारतामध्ये कुठल्याही घडीला 40 लाख कर्करोगी आढळतात.