एपीआय पुजारी यांनी मिळविला दुसर्‍यांदा ’मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

 

पनवेल (वार्ताहर): महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत  ’मास्टर महाराष्ट्र श्री’ हा बहुमान दुसर्‍यांदा पटकाविण्याची कामगिरी केली आहे.तसेच त्यांची पाँडिचेरी येथे देश पातळीवरील होणार्‍या मास्टर भारत श्री’ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धेत ते सहभागी होवून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.