माघी गणेशोत्सवातून जागवीला गड किल्ल्यांचा इतिहास!

 


उरण (वार्ताहर) - उरण शहरातील शिवराज युवा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेतर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाचे नियम पाळत सोशल फिजिकल डिस्टन्स पाळत मास्क व सॅनिटायजरचा वापर करत अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दि.5 फेबु्रवारी रोजी संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान किल्ला म्हणजे काय (किल्ल्याचे अंतरंग व वास्तूची ओळख )या विषयावर अपरिचित गडकोट शोध अभ्यासक, शिवभक्त जयकांत शिंक्रे (पालघर )यांनी डिजिटल चलचित्राद्वारे पडद्यावर विविध किल्ले, किल्ल्याची ओळख अत्यंत उत्तम पद्धतीने करून देत गड किल्ल्यांचा इतिहास जागविण्याचे कार्य केले.

यावेळी शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकूर, कार्याध्यक्ष मंगेश वाजेकर, उपाध्यक्ष संगीता ढेरे, सरचिटणीस सचिन भोईर, खजिनदार उमेश वैवडे, आदींसह शिवराज युवा प्रतिष्ठान गड संवर्धन प्रमुख गणेश तांडेल, द्रोणागिरी गड संवर्धन प्रमुख गणेश माळी, सुजित खैरे ( डोबिवली),  गणेश भोईर, वैभव भोईर, राजा नाईक, कौशिक म्हात्रे,  यज्ञेश म्हात्रे ,प्रतीक , राज म्हात्रे, रवी म्हात्रे , लक्ष्मण कातकरी, प्रमोद दादा, किशोर दादा, विराज शिरधनकर , इतर गड संवर्धन टीमचे मावळे व इतर सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.