ऐरोली (प्रतिनिधी) - जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात आज साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येवून महाराजांना वंदन करण्यात येत आहे. नवी मुुंबई महापालिका शाळा क्र.91 दिवा ऐरोली या शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळेतील सफाई कामगार असलेले उमेश म्हात्रे यांनी शाळेत महाराजांचा सुरेख असा किल्ला साकारुन शिवप्रभूंच्या पराक्रमाला अभिवादन केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह सफाई कामगार उमेश म्हात्रे यांनी महाराजांचा किल्ला व प्रतिमा साकारली आहे.