ठाणे(प्रतिनिधी) - अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकल्याप्रकरणी या घटनेचा ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशा मागणीचेे निवेदन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काल महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे देण्यात आले. ङ्गङ्ग
यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते. दरम्यान, शासकीय अधिकार्यांवर अशा प्रकारे हल्ला करणे हे निषेधात्मक असून अमरावतीमधील या घटनेचा ठाणे महापालिका सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निवेदन काल ना. एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यासोबतच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले आहे.